Ek tari Rucha... (एक तरी ऋचा अंगीकारावी)
₹ 375.00
2 or more ₹ 355.00 each
5 or more ₹ 335.00 each
8 or more ₹ 315.00 each
11 or more ₹ 285.00 each
15 or more ₹ 250.00 each
Description
आजपर्यंत यातून जमा झालेली रक्कम रु.697665/- गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी दिली आहे.
हरवलेली गोष्ट हरवली आहे, हे जर आठवणीत असले तर आपण शोधायला लागतो.
पण माझी एखादी गोष्ट हरवली आहे हेच जर मी विसरलो तर मग मी शोधण्याचा प्रयत्न करीन का?
असेच काहीसे आपल्या आयुष्यामध्ये आपल्या अनेक क्षमतांचे झाले आहे.
आपल्याला जाणीवच नाहीये की माझ्या या गोष्टी हरवल्या आहेत आणि म्हणून त्या क्षमतांचा शोध मी घेत नाहीये. पण शोधत गेलो तर नक्की सापडेलच.
आपण आणि आपल्या क्षमता यांच्या लपाछपीत हे पुस्तक एक मित्रम्हणून नक्की आपली साथ देईल.
आपण विसरलेल्या आपल्या क्षमतांची आठवण गणपतीअथर्वशीर्ष करून देते.
· अथर्वशीर्षाचे पहिले योगदान असे की या क्षमता आहेत हे सांगतं.
· अथर्वशीर्षाचे दुसरे योगदान असे की या क्षमता माझ्या आहेत याची जाणीव करून देतं
· अथर्वशीर्षाचे तिसरे योगदान असे की या क्षमता माझ्यामधेच दडल्या आहेत हे सांगतं
· अथर्वशीर्षाचे चौथे योगदान असे की या क्षमता मी पुन्हा मिळवू शकतो याचा विश्वास देतं.
· अथर्वशीर्षाचे पाचवे योगदान असे की या क्षमता पुन्हा उजळवण्यासाठी कमतरतांची काजळी कशी दूर करायची याचं मार्गदर्शन करतं.
असे हे गणपती अथर्वशीर्ष!
आयुष्य सोपं आणि सुंदर करण्यासाठी साध्या सोप्या युक्त्या सांगणारं, व्यवस्थापक, गुरु, शिष्य, विद्यार्थी, पालक, मित्र, टीममेंबर, नेता, वक्ता, श्रोता, योजक – आपल्यापैकी प्रत्येकासाठी अत्यंत उपयोगी असं!
याच विषयावरील २१ भागांच्या माझ्या व्हिडिओ मालिकेबद्दल अधिक माहितीसाठी http://www.dgonline.in/21ath
हे पुस्तक eBook स्वरुपात येथे उपलब्ध आहे : https://www.bookganga.com/R/83FIW